गांधींच्या जीवनचरित्राची विद्यार्थ्यांना दिली ओळख

By Admin | Updated: October 8, 2015 01:02 IST2015-10-08T01:02:58+5:302015-10-08T01:02:58+5:30

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे गांधी जयंतीपासून महात्मा गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

Gandhi's biography was given to the students | गांधींच्या जीवनचरित्राची विद्यार्थ्यांना दिली ओळख

गांधींच्या जीवनचरित्राची विद्यार्थ्यांना दिली ओळख

साखरा जि.प. शाळेत सप्ताहात विविध स्पर्धा
गडचिरोली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे गांधी जयंतीपासून महात्मा गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम चालणार असून या अंतर्गत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांनी मातीकाम, चित्रकला, उत्स्फूर्त लेखन, स्वयंस्फूर्त भाषण, कथाकथन मनाचे श्लोक, ग्रामगीता, ओवी, पाठांतर आदी उपक्रमात भाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक अनिल मुलकलवार यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ८ आॅक्टोबर रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या सप्ताहानिमित्ताने पालक-शिक्षक सभेचेही आयोजन करण्यात आले होते. गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gandhi's biography was given to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.