गाेंडवानाच्या परीक्षेत सुरुवातीलाच गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:55+5:302021-08-12T04:41:55+5:30
बी.ए., बी.एसस्सी, बी.काॅम आदी पदवीस्तरावरील तीनही वर्षांच्या ऑनलाइन परीक्षा आयाेजित करण्यात आल्या. सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेची लिंक उघडण्याचा ...

गाेंडवानाच्या परीक्षेत सुरुवातीलाच गाेंधळ
बी.ए., बी.एसस्सी, बी.काॅम आदी पदवीस्तरावरील तीनही वर्षांच्या ऑनलाइन परीक्षा आयाेजित करण्यात आल्या. सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेची लिंक उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती उघडत नसल्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना आला. एक तास प्रतीक्षा करूनही लिंक न उघडल्याने अखेर विद्यापीठ प्रशासनाने एका तासानंतर पुन्हा परीक्षा घेण्याचे जाहीर केले. काही विद्यार्थ्यांनी पेपर साेडविण्याचा प्रयत्न केला. मात्र उत्तरपत्रिका याेग्यरीत्या सबमिट करता आल्या नाही. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुन्हा संदेश पाठवून दाेन तासानंतर परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले. एकूणच तांत्रिक अडचणीमुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.
काेट ......
परीक्षेच्या पहिल्या दिवशी निर्माण झालेल्या सर्व अडचणी विद्यापीठाने दूर केल्या असून, ११ ऑगस्ट बुधवारपासून पुढे हाेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या व सर्व विषयांच्या परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वेळापत्रकाप्रमाणे सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने द्याव्या.
- डाॅ. अनिल चिताडे,
संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, गाेंडवाना विद्यापीठ