साग संग्रहालय जपतेय आदिवासी संस्कृती व इंग्रजांच्या आठवणी

By Admin | Updated: May 18, 2015 01:46 IST2015-05-18T01:46:19+5:302015-05-18T01:46:19+5:30

वन विभागाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या आलापल्ली येथील साग (टिक) संग्रहालयात आदिवासी संस्कृतीशी...

Gagan Museums Japtey tribal culture and the British memories | साग संग्रहालय जपतेय आदिवासी संस्कृती व इंग्रजांच्या आठवणी

साग संग्रहालय जपतेय आदिवासी संस्कृती व इंग्रजांच्या आठवणी

रोमित तोेंबर्लावार आलापल्ली
वन विभागाच्या मदतीने बनविण्यात आलेल्या आलापल्ली येथील साग (टिक) संग्रहालयात आदिवासी संस्कृतीशी संबंधीत विविध प्रकारच्या वस्तू व इंग्रजकालीन कक्रचालयात वापरण्यात येणारी विविध साहित्य ठेवण्यात आली असून सदर साहित्य अत्यंत दुर्मिळ व जुन्या तंत्राज्ञानाची आठवण करून देणारे आहे. अशा प्रकारचे जिल्ह्यातील हे एकमेव संग्रहालय असून दरदिवशी शेकडो पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात.
आलापल्ली हे वन विभागाचे अगदी सुरूवातीपासूनच केंद्रबिंदू राहिले आहे. या ठिकाणी इंग्रजांच्या काळात लाकूड कापण्यासाठी मशीनचा वापर केला जात होता. या ठिकाणच्या परिसराला क्रकचालय म्हणून ओळखले जात होेते. नवीन तंत्राज्ञानाबरोबरच क्रकचालयातील मशीनचा वापर बंद पडला. या मशीनच्या आठवणी जपण्याच्या उद्देशाने या मशीनचे सुटे भाग व त्या कालावधीत वापरण्यात येणाऱ्या इतरही वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे उद्घाटन १७ मे २०१४ रोजी तत्कालीन वन विभागाचे प्रधानसचिव प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी संस्कृती व वन विभागाबाबत सविस्तर माहिती देणारे एकमेव संग्रहालय आहे. या परिसरात येणारे अनेक पर्यटक, वन विभागाचे अधिकारी, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व इतिहासकार या संग्रहालयाला आवर्जून भेट देतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असल्याचे बघायला मिळते.
बांबूपासून इमारत निर्मिती
बांबुला रासायनिक मिश्रण लावून त्याची चौकोनी फ्रेम बनविण्यात आली. सदर फ्रेम लोखंडी साच्यामध्ये टाकून त्यामध्ये मॅग्नेशिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम आॅक्साईड, गिट्टीचुरा, गिट्टीउष्ट व पाणी टाकण्यात आले. अशा प्रकारे चौकोनी पॅनल तयार करण्यात आले आहेत. पॅनलच्या प्रत्येक मध्यभागात सिमेंट, विटांचे बांधकाम करून भिंत उभारण्यात आली आहे. सदर इमारत अत्यंत कमी खर्चात तयार झाली आहे.
कक्रचालयातील वस्तू
इंग्रजकालीन कक्रचालयातील अनेक वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने आरा जोडण्याची मशीन, ग्रार्इंडर मशीन, भुसा बंडी, आटा चक्की, तिजोरी, लिप्ट मशीन, करबा- कुटार मशीन, रोड रोलर, ट्रेन साकेट, सॉप्टींगपाना, गोल आरी, लाकुड कापण्याची ट्रॉली, चमचा लोहा, आग प्रतिबंधक सिलिंडर, कंदील, स्टोव्ह, बिनतारी संदेश यंत्रणा रजिस्टर, कामगारांची नोंदवही यांचा समावेश आहे.
आदिवासींशी संबंधित वस्तू
दैनंदिन जीवनात आदिवासी ज्या वस्तूंचा वापर करतात. सदर वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, धीर, पावसाळ्यात रोवणी करताना पाऊस लागू नये म्हणून वापरल्या जाणारे रेकी, थंड पाण्याचे बुरक, माठातून पाणी काढण्याचे बोक, आदिवासींचे वाद्य हाकुमी, बांबुपासून बनविलेली बासरी, तनसीने तयार केलेली नेटी व आदिवासी संस्कृती दर्शविणारे छायाचित्र यांचा समावेश आहे.

Web Title: Gagan Museums Japtey tribal culture and the British memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.