गडकरींकडे पाठपुरावा करून समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST2021-07-07T04:46:02+5:302021-07-07T04:46:02+5:30
व्यापाऱ्यांच्या धरणे मंडपात जाऊन अम्ब्रिशराव यांनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यानंतर त्यांनी व्यापारी तथा गावकऱ्यांसह नवीन पुलाचे काम ...

गडकरींकडे पाठपुरावा करून समस्या सोडविणार
व्यापाऱ्यांच्या धरणे मंडपात जाऊन अम्ब्रिशराव यांनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यानंतर त्यांनी व्यापारी तथा गावकऱ्यांसह नवीन पुलाचे काम तथा बाजारपेठ पुनर्वसनासाठी प्रस्तावित असलेल्या जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या जागेची पाहणी करून पूर्ण माहिती घेतली. यावेळी युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील विश्वास, भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, भामरागड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष बडगे, सचिव सलीम शेख, अनंत विश्वास, सुरेश कोडापे, बहादूर आलाम, संतोष मद्धर्लेवार, प्रदीप करमाकर, मनोज मंडल, जाधव हलधर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
060721\img-20210706-wa0020.jpg
राजे साहेब व्यापाऱ्यांशी चर्चा करताना