विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीचा शिवाई ग्रुप अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2016 02:14 IST2016-10-05T02:14:32+5:302016-10-05T02:14:32+5:30

जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे ३ आॅक्टोबर रोजी सोमवारला भंडारा येथे झालेल्या विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीच्या

Gadchiroli's Shivai Group topped the Vidarbstari Dandiya tournament | विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीचा शिवाई ग्रुप अव्वल

विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीचा शिवाई ग्रुप अव्वल

जिल्ह्याचा नावलौकिक : ३१ हजारांच्या पुरस्काराचा ठरला मानकरी
गडचिरोली : जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे ३ आॅक्टोबर रोजी सोमवारला भंडारा येथे झालेल्या विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत गडचिरोलीच्या शिवाई दांडिया ग्रुपने अव्वल स्थान मिळविले. दीपक उर्फ भाऊसाहेब मडके यांच्या नेतृत्वात सहभागी झालेल्या सदर शिवाई ग्रुप ३१ हजार रूपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला.
सदर शिवाई दांडिया ग्रुपमध्ये गडचिरोली येथील शिवाजी उप्पलवार, स्वप्नील एडलावार, बंटी राठोड, आशिष वाढई, विक्की केळझरकर, धनंजय सहदेव, सुप्रिया जक्कुलवार, वैष्णवी वर्धेवार, पूर्वा मुच्छलवार, प्रतिक भैसारे, अश्विनी दिवटे, अंकूश पवार व रोशनी पुराम या युवक युवतींचा समावेश आहे. या सर्वांनी भंडारा येथील विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावून प्रथम क्रमांक पटकाविला. यामुळे गडचिरोली या मागास जिल्ह्याचा दांडिया स्पर्धेत संपूर्ण विदर्भात नावलौकीक झाला आहे. जय मल्हार ग्रुप भंडारातर्फे सुमित घोगरे, सुरेश कनोजे, समीर सूर्यवंशी, पवन अग्रवाल, संदीप बेंदेवार यांनी विदर्भस्तरीय दांडिया स्पर्धेचे आयोजन केले. सुयशाबद्दल गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वच स्तरातून शिवाई दांडिया ग्रुपचे कौतुक केले जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli's Shivai Group topped the Vidarbstari Dandiya tournament