गडचिरोलीत बिबट्याची दहशत; वासराला केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:58 IST2018-11-12T16:58:29+5:302018-11-12T16:58:57+5:30
नरखेड तालुक्यातील सोनसरी परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम असून त्याने सोमवारी सकाळी एका वासराच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

गडचिरोलीत बिबट्याची दहशत; वासराला केले ठार
ठळक मुद्देपंधरा दिवसांपूर्वी इसमाला केले होते ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: नरखेड तालुक्यातील सोनसरी परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत कायम असून त्याने सोमवारी सकाळी एका वासराच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात जंगलात एका इसमाला बिबट्याने हल्ला चढवून ठार केले होते. तशात सोमवारी विजय गुरुकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा गळा पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती कळताच देलनवाडीचे वनपरिक्षेत्र अदिकारी कैलास धोंडणे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे.