गडचिरोलीचे उपवनसंरक्षक रूजू
By Admin | Updated: August 24, 2016 02:25 IST2016-08-24T02:25:51+5:302016-08-24T02:25:51+5:30
गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक म्हणून एस. बी. फुले हे २० आॅगस्ट रोजी रूजू झाले आहेत.

गडचिरोलीचे उपवनसंरक्षक रूजू
गडचिरोलीची माहिती जाणली : पदोन्नत वनपाल संघटनेतर्फे सत्कार
गडचिरोली : गडचिरोली वन विभागाचे उपवनसंरक्षक म्हणून एस. बी. फुले हे २० आॅगस्ट रोजी रूजू झाले आहेत. त्यांचा वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला.
यापूर्वीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबतुल्ला यांची अहमदनगर येथे बदली झाली आहे. त्या अहमदनगर येथे रूजू झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर एस. बी. फुले यांना नेमणूक देण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे फुले यांना गडचिरोली येथे रूजू होण्यास विलंब झाला. फुले यांचा वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरूण पेंदोेरकर, विभागीय अध्यक्ष मोतीराम चौधरी, अनंत ठाकरे, अतुल धात्रक, भारत राठोड, राजू धात्रक, विभागीय सचिव सुनील पेंदोरकर, बळवंत येवले यांच्यास संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)