शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

गडचिरोली जि.प.ला २.८६ कोटीने गंडा घालणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 7:56 PM

गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयांनी गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अखेर यश आले.

ठळक मुद्देबनावट धनादेश प्रकणाचा छडा मध्यप्रदेशसह नागपूर, भंडारा जिल्ह्यातील आरोपी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बनावट धनादेशावर बनावट स्वाक्षरी आणि आरटीजीएसकरिता बनावट पत्रही तयार करून गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपयांनी गंडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अखेर यश आले. वर्षभरापूर्वीपासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. एकूण ६ आरोपींना विविध ठिकाणावरून अटक करण्यात आली.

आरोपींमध्ये स्रेहदीप श्रीराम सोनी (४७) रा.नंदनवन नागपूर, किशोरीलाल हिरालाल डहरवाल (५१) रा.रेड्डी, ता.कुरई, जि.शिवणी (मध्यप्रदेश), सुदीप श्रीराम सोनी (५१) रा.नाईक रोड, महाल नागपूर, अमित मनोहर अग्निहोत्री (३५) रा.धनगवळी नगर, हुडकेश्वर नागपूर, अतुल देवीदास डुकरे (४२) रा.आशीर्वाद नगर नागपूर आणि विनोद मंगलसिंग प्रधान (४७) रा.करडी, ता.मोहाडी जि.भंडारा अशा ६ जणांचा समावेश आहे. वेगवेगळी पथके तयार करून त्यांना एकाचवेळी दि.५ ला ताब्यात घेऊन गडचिरोलीत आणण्यात आले. गुरूवारी (दि.६) त्यांना न्यायालयात हजर केले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या इतर आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे यांनी १९ सप्टेंबर २०१९ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.दरम्यान या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांनी हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. या शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी वर्षभराच्या मेहनतीनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले.

पाच खात्यांमध्ये वळती केली रक्कमसदर टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे जिल्हा परिषदेची रक्कम वेगवेगळ्या नावांच्या पाच खात्यांमध्ये वळती केली. त्यात रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, निर्वाणा बिल्डर्स, चिरंजीवी ट्रेडलिंक, उत्कर्ष निर्माण कंपनी आणि पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी यांचा समावेश आहे.

अनेक प्रकरणे पुढे येणारया आरोपींचा सुगावा आधीच लागला होता. पण त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनाही एकाचवेळी ताब्यात घेणे गरजेचे होते, त्यामुळे थोडा वेळ लागला. या टोळीने अशा पद्धतीने इतरही ठिकाणी गंडा घातला असण्याची दाट शक्यता आहे. त्या सर्व प्रकरणांचा छडा आता लागेल, असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी