मुंबईमध्ये धावले गडचिरोलीचे युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:58 IST2018-01-21T22:57:40+5:302018-01-21T22:58:00+5:30
मुंंबई येथील आझाद मैैदानावर टाटा-मुंंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ युवकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.

मुंबईमध्ये धावले गडचिरोलीचे युवक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुंंबई येथील आझाद मैैदानावर टाटा-मुंंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील १७ युवतींसह ७३ युवकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या युवकांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागातर्फे या युवकांना मुंबई मॅराथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात आले होते. या युवकांसोबत गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागातील युवकांचा सहभाग होता. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे व गोंदियाचे अप्पर पोलीस अधीक्षक अठवडे यांनी प्रत्यक्ष मॅरेथॉनच्या ठिकाणी उपस्थित राहून युवकांचा उत्साह वाढविला. गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक चव्हाण, राखीव पोलीस उपनिरीक्षक महादेश्वर यांच्या नेतृत्त्वात युवकांना पाठविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईचा झालेला विकास युवकांना बघता आला. मॅरेथॉनमध्ये सहभागी युवक आनंदी दिसून येत होते.