गडचिरोलीवरील अन्याय खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:32 IST2021-01-17T04:32:16+5:302021-01-17T04:32:16+5:30
विद्यापीठाच्या निर्मितीपासून आतापर्यंत ७ दीक्षांत समारंभ यशस्वीरीत्या विद्यापीठाच्या परिसरात पार पडले. या दीक्षांत समारंभांना काही कारणास्तव कुलपती उपस्थित राहू ...

गडचिरोलीवरील अन्याय खपवून घेणार नाही
विद्यापीठाच्या निर्मितीपासून आतापर्यंत ७ दीक्षांत समारंभ यशस्वीरीत्या विद्यापीठाच्या परिसरात पार पडले. या दीक्षांत समारंभांना काही कारणास्तव कुलपती उपस्थित राहू शकले नव्हते. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभाकरिता कुलपती येणार आहेत. मात्र, तोच दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे होऊ घातल्याने गडचिराेली जिल्ह्यावर अन्याय हाेत असल्याचा आरोप सारडा यांनी केला आहे. मागील १० वर्षापासून सुरू असलेला गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर येथे हलविण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर येथील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. ही मागणी करणे चुकीचे आहे. चंद्रपूरचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूरनेच खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या विकासासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गडचिराेली जिल्ह्यावर वारंवार अन्याय करीत आहेत. गाेंडवाना विद्यापीठासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा गोविंद सारडा यांनी दिला आहे.