शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घर मे घुसके मारेंगे... अत्याचार प्रकरणातील आरोपीचा व्हिडीओ व्हायरल

By संजय तिपाले | Updated: June 12, 2023 16:46 IST

आदिवासी मुलीचे लैंगिक शोषण: दोन्ही आरोपी पक्ष, संघटनेशी संंबंधित

गडचिरोली : दहावी उत्तीर्ण झालेल्या आदिवासी अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना १० जूनला एटापल्ली तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, दोन्ही आरोपी हे पक्ष, संघटनेशी संबंधित असल्याची माहिती उजेडात आली असून यातील एका आरोपीचा घर मे घुसके मारेंगे... असा इशारा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

एटापल्ली तालुक्यातील एक मुलगी वसितगृहात शिक्षण घेते. दहावी उत्तीर्ण झाल्याने पुढील शिक्षणासाठी टीसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) घेण्याकरता ती १० जून रोजी आली होती. शिक्षकांनी टीसीसाठी नंतर येण्यास सांगितल्याने ती परत जाण्यासाठी निघाली. यावेळी तिच्या ओळखीचा नेहाल शामसुंदर कुंभारे (२४,रा.जीवनगट्टा ता. एटापल्ली) हा दुचाकीवरुन जाताना दिसला. यावेळी पीडितेने त्यास कॉल केला असता तो तिला भेटण्यासाठी आला. पीडितेला चक्कर येऊ लागल्याने तिने काही वेळ सुरक्षित ठिकाणी घेऊन चल, असे सांगितले. त्यानंतर नेहालने तिला दुचाकीवरुन रोशन विठ्ठल गोडसेलवार (२२,रा.आलापल्ली) याच्या घरी नेले.

त्या दोघांसोबत तेथे अन्य एक होता. त्याला खाऊ आणण्यासाठी बाहेर पाठवले,  त्यानंतर पीडितेला पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे झाले. याचा फायदा घेत नेहाल व रोशन यांनी तिच्यावर अत्याचार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. सायंकाळी घरी परतल्यावर तिने घडला प्रकार कुटुंबीयास सांगितला. त्यानंतर नेहाल कुंभारे व रोशन गाेडसेलवार यांच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला.

टीसी काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन आरोपींना अटक

आलापल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो तपाकामी अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. पो.नि.किशोर महानुभव यांनी तातडीने सूत्रे फिरवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. यापैकी नेहाल कुंभारे हा शिवसेना युवा सेनेचा तर रोशन हा बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर रोशन गोडसेलवार याचा घर मे घुसके मारेंगे... शोक एैसे पाले है... कोई पुछे हमारे बारे मे तो कह देना बजरंग वाले है.. असे सांगणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ त्याने कधी बनवला, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

शिवसेनेशी संबंध नाही

बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकूर म्हणाले, संबंधित आरोपी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याची माहिती घ्यावी लागेल, अहेरी माझ्या कार्यक्षेत्रात नाही, असे त्यांनी सांगितले. अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख रियाज शेख म्हणाले, या आरोपीचा शिवसेनेशी संबंध नाही. त्याच्याकडे अधिकृत कुठले पद नाही व तो पक्षाचा अधिकृत सदस्यही नसल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंगGadchiroliगडचिरोली