गडचिरोली कडकडीत बंद
By Admin | Updated: April 21, 2015 01:17 IST2015-04-21T01:17:30+5:302015-04-21T01:17:30+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरुन तसेच त्यांच्या फोटोवर फुली मारुन

गडचिरोली कडकडीत बंद
सर्व पक्षीयांनी घेतली निषेध सभा : समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी
गडचिरोली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरुन तसेच त्यांच्या फोटोवर फुली मारुन धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ गडचिरोली येथे सोमवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवली. यावेळी कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
शंकर संदेश व दीपक तलवार सावरकर अशा दोन फेसबूक खात्यावरुन मोबाईलवर मेसेज पाठवून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या इसमांवर कठोर कारवाई करुन उपरोक्त प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या मागणीसाठी सोमवारी गडचिरोली येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. या सभेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम मेश्राम, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद पिपरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार, प्रा.रमेश चौधरी, माजी नगरसेवक विनोद शनिवारे, नगरसेवक संजय मेश्राम, नगरसेविका मीनल चिमूरकर, युवक कॉग्रेसचे नेते रजनिकांत मोटघरे, मनिष डोंगरे, मादगी समाज संघटनेचे नेते देवाजी लाटकर, भाजप नेते डी.के.मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना मेश्राम, जगन जांभूळकर, निमगडे, संदीप रहाटे, राजेंद्र बांबोळे, संदीप बेलखेडे, प्रफुल्ल रामटेके, लक्ष्मण रामटेके, शाम वाढई, देवानंद सुखदेवे, अश्विन झाडे, हेमंत शेंडे, प्रतीक बारसिंगे, अतुल रायपुरे, शेवान पाटील, सुमीत मेश्राम, पिंटू डांगे, पंकज मेश्राम, प्रशांत खोब्रागडे, माधुरी खोब्रागडे, वनिता बांबोळे, सिद्धार्थ मेश्राम, गौतम मेश्राम, सिद्धार्थ टेंभूर्णे, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रफुल्ल रामटेके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळी कार्यकर्त्यांनी व्यापारी व दुकानदारांना आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. दुपारनंतरही दुकान उघडली नाही. त्यामुळे शहरात चहाटपरीसुध्दा बंद होत्या. इंदिरा गांधी चौकात बंद दरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेसंदर्भात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले.