गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त
By Admin | Updated: February 26, 2016 01:44 IST2016-02-26T01:44:30+5:302016-02-26T01:44:30+5:30
गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे.

गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त
गडचिरोली : गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे. या तीन दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील या दारू विक्रेत्यांनी दोन एलपीजी सिलिंडरला होल (छिद्र) करून त्यात दारूच्या निपा ठेवल्या होत्या.
भडांगे मोहल्ला येथील मंदाबाई श्रीहरी वांढरे (५०) व किशोर पंजाब जुमडे (२६) यांच्याकडून पोलिसांनी विदेशी दारूच्या १० हजार ५०० रूपयांच्या ४२ निपा, मॅकडोनाल कंपनीच्या २ हजार १०० रूपयांच्या सात निपा व देशी दारूच्या १६ हजार ७५० रूपयांच्या ३३५ निपा असा एकूण २९ हजार ३५० रूपयांचा माल जप्त केला. मंदाबाई वांढरे, किशोर जुमडे या दोघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर सर्वोदय वार्डातील कुंदा रवी कोंडावार (५०) हिच्याकडून विदेशी दारूच्या ७ हजार ५०० रूपयांच्या ३० निपा मॅकडोनाल दारूच्या ४ हजार २०० रूपयांच्या १४ निपा असा ११ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हिच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)