एड्स दिनानिमित्त गडचिरोलीत रॅली
By Admin | Updated: December 3, 2015 01:48 IST2015-12-03T01:48:14+5:302015-12-03T01:48:14+5:30
जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम पथक आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या वतीने मंगळवारी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला.

एड्स दिनानिमित्त गडचिरोलीत रॅली
जनजागृती : जीवनात संयम पाळण्याचे अनिल रूडे यांचे आवाहन
गडचिरोली : जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम पथक आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या वतीने मंगळवारी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. एचआयव्ही/एड्स रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी इंदिरा गांधी चौकातून सकाळी ९ वाजता रॅली काढण्यात आली.
यावेळी रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. शैलेजा मैदमवार, बारसागडे, साळवे आदी उपस्थित होते. या रॅलीमध्ये परिचर्या प्रशिक्षण संस्था, महाविद्यालयीन प्राचार्य, शिक्षक, स्काऊट गाईड विद्यार्थी, एनसीसी प्रकल्प,विहान प्रकल्पाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी रॅलीला मार्गदर्शन करताना डॉ. अनिल रूडे यांनी जीवनात संयम पाळा, तरूण वयात असणारे धोके व त्यापासून होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले. जिल्ह्यात राबविण्यात येणारे विविध कार्यक्रम आदीबाबत माहिती दिली.
रॅलीच्या माध्यमातून असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया, एचआयव्ही बाधीत मातेकडून होणाऱ्या बाळास लागण आदी विषयीची माहिती व सुरक्षेचे महत्त्व समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य तर आभार भांडेकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)