शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

गडचिरोली पोलिस दलाचा दबदबा कायम ; ७ शूरवीरांना राष्ट्रपती शौर्य पदक

By संजय तिपाले | Updated: August 14, 2025 17:31 IST

माओवादविरोधी मोहिमेत प्राणाची बाजी: हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीत धाडसी कारवाई

गडचिरोली : घनदाट जंगल, प्रतिकूल भौगोलिक स्थितीत सशस्त्र माओवाद्यांविरुध्द जीवाची बाजी लावून शौर्य गाजविणाऱ्या सात जवानांना पोलिस सेवेतील अतिशय मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पदकांची घोषणा झाली, यात महाराष्ट्रात गडचिरोली पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपला दबदबा राखला. जिल्हा पोलिस दलाच्या खडतर व शौर्यपूर्ण कामगिरीचा हा सन्मान असल्याच्या प्रतिक्रिया यानंतर उमटल्या.

देशभरात पोलिस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या   अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त   सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा १४ ऑगस्ट  रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला    राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.

पोलिस शौर्य पदकाचे हे आहेत मानकरी

सन २०२५ मध्ये जिल्हा पोलिस दलातील  सहायक  निरीक्षक नेताजी   बंडगर, , सहायक उपनिरीक्षक मनोहर  महाका,  हवालदार  मनोहर पेंदाम,  अंमलदार प्रकाश  कन्नाके,  अतुल  येगोलपवार,  हिदायत  खान हे पोलिस शौर्य पदकाचे मानकरी ठरले. शहीद जवान सुरेश तेलामी यांना मरणोत्तर पोलिस शौर्य पदक मिळाले आहे. 

भूसुरुंग स्फोट घडवून हल्ला, धाडसाने मोहीम फत्ते२०१७ मध्ये सी- ६० जवान कोठी पोलिस ठाण्यातून वाहनांद्वारे भामरागडला परतत होती. माओवाद्यांनी हेमलकसा- कारमपल्ली रस्त्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता.   जखमी व अडकलेल्या  जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत सी- ६० जवानांनी माओवाद्यांच्या हल्ल्याला जोरदर प्रत्युत्तर देत मोहीम फत्ते केली. री सदरच्या भूसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन  राष्ट्रपती यांचे पोलिस शौर्य पदक जाहीर झाले आहे.  पोलिस अधीक्षक  नीलोत्पल यांनी पदकप्राप्त जवानांचे स्वागत केले आहे.

पाच वर्षांत शौर्य पदकांचे द्विशतकमाओवादविरोधी मोहिमांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल मागील पाच वर्षांत जिल्हा पोलिस दलातील अधिकारी - अंमलदारांना ३ शौर्य चक्र, २१० पोलिस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ८ पदके प्राप्त झाली आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन