गडचिरोली पोलिसांनी केली २२ लाखांची अवैध दारू नष्ट
By Admin | Updated: August 3, 2016 02:03 IST2016-08-03T02:03:55+5:302016-08-03T02:03:55+5:30
गडचिरोली जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी गडचिरोलीला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा आणि छत्तीसगड

गडचिरोली पोलिसांनी केली २२ लाखांची अवैध दारू नष्ट
प्रकरणे निकाली : न्यायालयाने दिले दारू नष्ट करण्याचे आदेश
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा दारूबंदी जिल्हा असला तरी गडचिरोलीला लागून असलेल्या भंडारा, गोंदिया जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करांवर कारवाई करून पोलीस मोठ्या प्रमाणात दारू जप्त करतात.यातील काही प्रकरणे न्यायालयाने निकाली काढल्याने न्यायालयाच्या आदेशाने गडचिरोली पोलिसांनी २२ लाख ३४ हजार रुपयांची दारू नष्ट केली.
गडचिरोली पोलीस ठाण्यांकडून आजपर्यंत अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी गडचिरोलीच्या न्यायालयात अनेक प्रकरणे सुरु होते. न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणांचा न्यायालयाने निकाल लावला. गडचिरोली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे गडचिरोलीच्या ठाण्यात जप्त असलेल्या १९ हजार देशी दारूच्या बाटला आणि ५ हजार विदेशी दारूच्या बाटला असा एकूण २२ लाख ३४ हजार ४० रुपयांचा दारू साठा रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने नष्ट करून तो जमिनीत गाडण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक शेख व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)