शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

गडचिरोलीत पीएलजीए सप्ताह; जिल्ह्यातील नक्षल कारवाया रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:06 PM

नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे१२ दिवसात चार नागरिकांची हत्या

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नक्षलवाद्यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढत अचानक हिंसक कारवाया सुरू केल्याने पोलीस यंत्रणा त्रस्त आहे. त्यात आता त्यांना शनिवार दि.२ पासून सुरू होत असलेल्या पीएलजीए सप्ताहाचा सामना करावा लागणार आहे. नक्षल्यांना या सप्ताहात कोणत्याही नक्षल कारवाया घडविण्यात यश येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. परंतु दहशतीत असलेल्या नागरिकांना दिलासा देऊन नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडण्याचे कठीण आव्हान या सप्ताहात पोलिसांना पेलावे लागणार आहे.नक्षल चळवळीतील सदस्य केवळ पोलीस यंत्रणेला आपले शत्रू मानत असले तरी पोलिसांना मदत केल्याचा संशय असणारे सामान्य गावकरीही त्यांच्या दृष्टीने शत्रू ठरतात. यातूनच गेल्या १२ दिवसात चार नागरिकांची हत्या करून एकाच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यातून गावकऱ्यांमध्ये आपली दहशत पसरविण्याचा हेतू नक्षल्यांनी बऱ्याच प्रमाणात साध्य केल्याचे दिसून येते. गेल्या जुलै-आॅगस्टमधील नक्षल्यांच्या शहीद सप्ताहात ज्या पद्धतीने गावोगावचे नागरिक नक्षल्यांविरूद्ध खुलेआम रस्त्यावर उतरून आवाज उठविताना दिसले. मात्र दहशतीमुळे यावेळी तशी परिस्थिती दिसत नाही. नागरिकांच्या मनात असंतोष असला तरी नक्षली दहशतीमुळे ते पुढे येण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्याचेही आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.नक्षल्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी सी-६० पथक आणि सीआरपीएफचे जवान डोळ्यात तेल घालून गस्त करीत आहे. याशिवाय बॉम्बशोधक-नाशक पथकाकडून तपासणी सुरू आहे. छत्तीसगड सीमेकडील भागात नक्षल्यांच्या हालचाली जास्त असल्यामुळे त्या भागावर नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमकपणे राबविले जाण्याची शक्यता आहे.पीएलजीए सप्ताहादरम्यान कोणत्याही हिंसक घटना घडणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. ज्या नागरिकांची गेल्या ८-१० दिवसात नक्षल्यांकडून हत्या झाली त्यातील बऱ्याच लोकांचा पोलिसांशी संबंध नव्हता, पण गावातील लोकांच्या हेव्यादाव्यातून कोणाचा काटा काढण्यासाठी त्याचे नाव समोर करण्यात आल्याचे दिसून येते. वास्तविक नक्षल चळवळीला लोकच नाही तर नक्षल सदस्यही कंटाळले आहेत. त्यांनी मनात कोणतीही शंका-कुशंका मनात न ठेवता पोलिसांना शरण यावे. शासनाच्या धोरणानुसार त्यांना सर्व प्रकारचे लाभ दिले जातील.- अंकुश शिंदे, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस