गडचिरोलीत आक्षेपावरून घमासान

By Admin | Updated: September 29, 2014 23:04 IST2014-09-29T23:04:28+5:302014-09-29T23:04:28+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून सोमवारी छाननीअंती ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. सर्वाधिक ६ अर्ज अहेरी विधानसभा क्षेत्रात रद्द झाले आहे. गडचिरोली विधानसभा

Gadchiroli overcame objection | गडचिरोलीत आक्षेपावरून घमासान

गडचिरोलीत आक्षेपावरून घमासान

भाजप उमेदवारावर आज होणार निर्णय : छाननीत तीन मतदार संघात ११ उमेदवारी अर्ज कटले
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून सोमवारी छाननीअंती ११ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. सर्वाधिक ६ अर्ज अहेरी विधानसभा क्षेत्रात रद्द झाले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २ व आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३ नामांकन अर्ज छानणीअंती रद्द झाले. गडचिरोली येथे एक अपक्ष व एक बसपा उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. अहेरी येथे राणी रूख्मीणीदेवी सत्यवानराव आत्राम (भाजप), प्रभुदास आत्राम (बसपा), रामेश्वरबाबा जगन्नाथराव आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस), पेंटारामा तलांडी अपक्ष, मनसेचे उमेदवार दिनेश ईश्वरशहा मडावी व संतोष मल्लाजी आत्राम (भाजप) यांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष निरांजनी चंदेल, अपक्ष शिवराम कुमरे, अपक्ष लोकेशचंद्र फत्तेलालशहा सयाम यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. गडचिरोली क्षेत्रात बसपाचे शिशूपाल तुलावी व अपक्ष उमेदवार संजय डोनाजी हिचामी यांचे अर्ज बाद झाले आहेत.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आक्षेप नोंदविल्याने गडचिरोलीतील वातावरण चांगलेच तापले होते. गडचिरोली शहरासह मतदार संघाच्या ग्रामीण भागातही आज दिवसभर याच विषयाची चर्चा होती. या प्रकरणी गडचिरोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत या संदर्भातील निकाल राखून ठेवला असल्याची माहिती प्रशासनाने लोकमतशी बोलताना दिली.
डॉ. देवराव माडगुजी होळी हे चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया मंत्रालयस्तरावर व न्यायालयात सुध्दा गेली. गडचिरोली येथील आरोग्य यंत्रणेकडे याबाबत माहितीच्या अधिकारात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माहिती घेतली. या माहितीच्या आधारे डॉ. होळी हे शासकीय सेवेतच वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ही बाब स्पष्ट झाली. या आधारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप मांडलेत. भारतीय जनता पक्षाच्यावतीने युक्तीवाद करण्यासाठी तीन विधिज्ञ आज उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले होते. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयातच आक्षेप ऐकूण घेण्याचा कार्यक्रम होता. मात्र भाजप उमेदवाराविषयीच्या आक्षेपांबाबत विरोधी पक्ष आक्रमक असल्याचे दिसून आल्याने निवडणूक प्रशासनाने ऐनवेळी आक्षेपासंदर्भातील छानणी प्रक्रियेचा कार्यक्रम पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात ठेवला. मागील दोन महिन्यांपासून डॉ. होळी यांच्याबाबत विरोधक सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या मागे होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli overcame objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.