Nagar Panchayat Election 2022: ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 13:01 IST2022-01-18T12:51:39+5:302022-01-18T13:01:57+5:30
सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान पार पडले आहे.

Nagar Panchayat Election 2022: ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान
गडचिरोली : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये आज ११ जागांसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून ११.३० पर्यंत ५३ टक्के मतदान पार पडले आहे.
जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा या नगरपंचायतीकरिता ११ जागांवर ५ हजार ७०६ मतदार आपला हक्क आज बजावणार आहेत. या भागात राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, भाजपचे माजी राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते दीपक आत्राम या तीन बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.