शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

गडचिरोलीत मोस्ट वाँटेड आरोपीने दिली पोलिसांच्या हातावर तुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 8:41 PM

कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा ऊर्फ शबाना चौधरी प्रकरणातील मोस्ट वॉटेंड आरोपी राज मोहम्मद चौधरी हा मागील एक वर्षापासून पोलिसांना चकमा देत आहे.

ठळक मुद्दे राज मोहम्मद फरारचकोट्यवधीच्या शिफा फसवणूक प्रकरणाच्या तपासाचा दुसरा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील राजेंद्र वॉर्डात ब्युटी पार्लरच्या आड अत्यल्प किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा ऊर्फ शबाना चौधरी प्रकरणातील मोस्ट वॉटेंड आरोपी राज मोहम्मद चौधरी हा मागील एक वर्षापासून पोलिसांना चकमा देत आहे. या प्रकरणाच्या तपासाचा दुसरा टप्पा सुरू असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र त्याचा किंवा इतर आरोपींचा थांगपत्ता लावण्यात अद्याप तरी पोलिसांना यश आलेले नाही.

राज मोहम्मद हा पोलिसांच्या हाती लागल्यास त्याच्याकडून बºयाच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. देसाईगंज पोलिसांनी १८ जून २०१९ रोजी शिफाच्या राहत्या घरी धाड टाकून प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, अनेक आक्षेपार्ह दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले होते. दरम्यानच्या काळात आरोपी शिफा देसाईगंज शहरातून फरार झाली होती.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शिफा व तिचा भाचा निसार अहेमद चौधरी यांना उत्तरप्रदेशातून अटक केली होती. देसाईगंज पोलीस ठाण्यात या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. शिफा आणि तिचा भाचा निसार याला नागपूरच्या एमपीआयडी न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना ६ जुलै २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची नागपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.सदर प्रकरणात १५ जणांच्या लेखी बयाणावरून १ कोटी ९२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु अनेक गुंतवणूकदार पुढे आलेच नाही.

आरोपी राजच उलगडणार प्रकरणाचे ‘राज’या प्रकरणात अटकेत असलेले दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असताना देसाईगंज व आरमोरीतील संशयित सहा जणांच्या घरांची झडती घेण्यात आली. सहा पैकी चार जणांकडून एमपीआयडी कायद्याअंतर्गत काही रक्कमही वसूल करण्यात आली. पण ती रक्कम अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. राज चौधरी याला अटक केल्यास गुंतवणूकदारांकडून उर्वरित जमा रक्कम जप्त करणे, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहेत काय, यासह इतर बाबींचा छडा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे. मात्र आर्थिक फसवणूक झालेले गुंतवणूकदार केवळ दबक्या आवाजात चर्चा करीत आहेत.

आरोपी राज मोहम्मद याचा शोध कसून सुरू आहे. सदर आरोपीचा पत्ता ज्याला माहित असेल त्यांनी आम्हाला सांगावे, सांगणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. या प्रकरणात ज्यांचे पैसे अडकले त्यांचे बयाण घेण्यात आले आहे.- उल्हास भुसारी,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी