गडचिरोलीत बिबट्याला लागली कोंबड्यांची चटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:53 IST2020-10-07T18:52:24+5:302020-10-07T18:53:00+5:30
Gadchiroli News, Leopard चामोर्शी मार्गावरील लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या संत गाडगेबाबा नगरातील कोंबड्यांवर प्रत्येक रात्री बिबट्या डल्ला मारत आहे.

गडचिरोलीत बिबट्याला लागली कोंबड्यांची चटक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलजवळ असलेल्या संत गाडगेबाबा नगरातील कोंबड्यांवर प्रत्येक रात्री बिबट्या डल्ला मारत आहे. त्या बिबट्याला कोंबड्यांची चटक लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत गाडगेबाबा नगरातील अनेकांच्या घरी कोंबड्या आहेत. यातील बहुतांश नागरिकांच्या कोंबड्या घरातील अंगणात किंवा झाडांवरून बसून राहतात. काही दिवसांपूर्वी बिबट्याने दोन कोंबड्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे बिबट्याला आता कोंबड्यांची चटक लागली आहे. त्यामुळे तो प्रत्येक रात्री वॉर्डात शिरून कोंबड्या फस्त करीत आहे. सोमवारी रात्री याच वॉर्डातील एका नागरिकाच्या घराच्या पायऱ्यांवर चढून बिबट्याने कोंबड्या फस्त केल्या. त्याच्या पायांचे ठसे अंगणात उमटले आहेत. दरदिवशी संत गाडगेबाबा नगराचा परिसर शेतीला लागून आहे. शेतीत कपाशीची लागवड केली आहे.