गडचिरोलीत बाबूजींना आदरांजली
By Admin | Updated: November 26, 2015 01:08 IST2015-11-26T01:08:44+5:302015-11-26T01:08:44+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांचा स्मृती दिन कार्यक्रम बुधवारी गडचिरोली जिल्हा लोकमत कार्यालयात घेण्यात आला.

गडचिरोलीत बाबूजींना आदरांजली
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांचा स्मृती दिन कार्यक्रम बुधवारी गडचिरोली जिल्हा लोकमत कार्यालयात घेण्यात आला.
या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ. साळवे इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग कॉलेज चातगावचे संस्थापक प्राचार्य डॉ. प्रमोद साळवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, जिल्हा सचिव अविनाश महाजन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी अभिनय खोपडे, लोकमतचे गडचिरोली येथील प्रमुख वितरक श्रीकांत पतरंगे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन करून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी स्व. जवाहरलालजी दर्डा यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत दिलेली योगदानाबद्दल भावपूर्ण उल्लेख केला. लोकमत वृत्तपत्र समूहाने आपली सामाजिक बांधिलकीची भूमिका बाबूजींनी दाखविलेल्या दिशेने कायम ठेवली असून त्यामुळेच लोकमत महाराष्ट्राच्या मातीत अजूनही घट्टपणे रूजून आहे, असा भावपूर्ण उल्लेख केला. यावेळी लोकमत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)