गडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:00 IST2018-02-08T12:59:42+5:302018-02-08T13:00:19+5:30

आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे.

Gadchiroli handicraft will be placed now in abroad; Singapore's Initiative | गडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार

गडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार

ठळक मुद्देवनौषधींचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणाऱ्यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे. त्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे.
गडचिरोलीतील एकता सामाजिक शिक्षण संस्थेने व्हॅल्युबिट इंटरनॅशनल व्हेन्चर्स प्रा.लि. सिंगापूर या कंपनीशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. कंपनीनेही त्यासाठी स्वारस्य दाखविले. त्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात गडचिरोलीसह कोणत्याही राज्यातील हस्तकला उत्पादन ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने चर्मकला, काष्ठशिल्पकला, बांबूकला, धातूकला, मातीकला, विणकाम यासह वनौषधीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत.
सिंगापूरच्या कंपनीचे अधिकारी प्रदर्शनाची पाहणी करून या कलाकृतींच्या विक्रीसंदर्भात चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रदर्शनात आपल्या हस्तकलांचे नमुने सादर करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक प्रकाश अर्जुनवार यांनी केले आहे.

Web Title: Gadchiroli handicraft will be placed now in abroad; Singapore's Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.