ओबीसींचा मानवी हक्कांसाठी गडचिरोलीत एल्गार
By Admin | Updated: December 10, 2015 01:42 IST2015-12-10T01:42:04+5:302015-12-10T01:42:04+5:30
ओबीसींचे घटनादत्त अधिकार नाकारण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून ...

ओबीसींचा मानवी हक्कांसाठी गडचिरोलीत एल्गार
धरणे आंदोलन : आरक्षणासह विविध अधिकार नाकारले
गडचिरोली : ओबीसींचे घटनादत्त अधिकार नाकारण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून १० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळात गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात ओबीसी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा ओबीसी कर्मचारी असोसिएशचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी दिली आहे.
भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४० नुसार ओबीसींना एससी, एसटी प्रमाणे घटनात्मक दर्जा दिलेला आहे. असे असतानाही ओबीसींची स्वतंत्र सूची केल्या जात नाही. जातनिहाय जनगणना करून ओबीसींची जनगणना नाकारण्यात आली आहे. अर्थ संकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद नाही. ओबीसींचा नोकरीचा अनुशेष पूर्ण केला जात नाही. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग नोकर भरतीमध्ये सुप्रिम कोर्टाने मान्य केलेली मंडल आयोगाची शिफारस नाकारल्या जाते. व्यवसायिक अभ्यासक्रमासाठीची फ्रिशिपची मर्यादा ६ लाख करण्याचा निर्णयही प्रलंबित आहे. स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.