शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन; अजून किती दिवस करायची ही जगण्याची कसरत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 07:00 IST

महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा चार महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटत असताना हे लोक मात्र ‘अदखलपात्र’ ठरतात.

मनोज ताजनेगडचिरोली : मुंबईत पावसामुळे एक दिवस रस्ते तुंबतात तेव्हा तो राष्ट्रीय बातमीचा विषय होतो. कोल्हापुरात पूरपरिस्थितीत लोक अडकून पडतात तेव्हा वायुदलासह सर्व यंत्रणा धावून जाते. पण महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरच्या गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा चार महिनेपर्यंत जगाशी संपर्क तुटत असताना हे लोक मात्र ‘अदखलपात्र’ ठरतात. आजच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. याही वर्षीच्या पावसाळ्यात त्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. हे प्रशासकीय यंत्रणेचे आणि राज्यकर्त्यांचे अपयशच म्हणावे लागेल. चार दशकांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या या जिल्ह्याची स्थिती बदलण्यासाठी आता दिल्ली-मुंबईत बसून नाही तर प्रत्यक्ष गावात जाऊन निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.

केंद्र सरकारने दीड वर्षापूर्वी देशातील ११५ अतिमागास जिल्ह्यांची यादी तयार करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा कृती आराखडा तयार केला. त्या यादीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदूरबार, जळगाव आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश केला. आरोग्य, शिक्षणासह अनेक बाबतीत या जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली. तीन-तीन दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यावर मंथन झाले. पण प्रत्यक्षात त्याचे फलित काय हे अजूनपर्यंत दिसले नाही. मागास जिल्ह्याच्या नावावर येणारा पैसा नेमका कशावर खर्च होतो यापासून सामान्य माणूस पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्याच्या दैनंदिन जीवनमानात गेल्या अनेक वर्षात यत्किंचितही फरक पडलेला नाही.

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, अशिक्षित जिल्ह्याला गेल्या चार दशकांपासून नक्षलवादाने पोखरून या जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसविली हे जरी सत्य असले तरी किती दिवस हे तुणतुणे वाजवत मूळ प्रश्नांना बगल देणार? आज गडचिरोली जिल्ह्यात जेमतेम २०० च्या घरात (पोलिसांच्या आकडेवारीनुसार) शिल्लक असणाऱ्या नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी १० हजार सशस्त्र पोलीस तैनात असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा पोलीस दलाचे विशेष प्रशिक्षित पथक आणि या सर्वांच्या दिमतीला कोट्यवधीचे भाडे असणारे हेलिकॉप्टर असा अवाढव्य खर्च होत आहे. या खर्चाचे आकडे पाहिल्यास जिल्ह्याच्या एकूण विकास निधीपेक्षा कितीतरी अधिक पटीने खर्च केवळ नक्षलविरोधी अभियानावर केला जातो. इतक्या वर्षात यावर खर्च झालेला पैसा जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च झाला असता तर या जिल्ह्याचा मागासलेपणाचा शिक्का तर पुसल्याच गेला असता, शिवाय प्रगत जिल्ह्यांच्या पंगतीतही हा जिल्हा येऊन बसला असता. नक्षलवाद फोफावण्यामागे विकासाचा अभाव हे एक कारण असल्याचे सांगितले जाते. मग विकास करून नक्षलवाद संपवण्यासाठी कुणी सरकारचे हात बांधले का? हे म्हणजे ‘कळतं पण वळत नाही’ अशी स्थिती आहे.

पावसाळ्यात चार महिने ज्या गावांचा इतर गावांशी आणि पर्यायाने जगाशीच संपर्क तुटतो ते लोक कोणत्या परिस्थितीत राहात असतील याची कल्पना आपण करू शकत नाही. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहतात. इतर वेळी त्या नाल्याच्या कोरड्या पात्रातून किंवा गुडघाभर पाण्यातून वाट काढत गावातून बाहेर येणे त्या गावकऱ्यांना शक्य असते. पण पावसाळ्यात १३०० मिमीपेक्षा जास्त बरसणाऱ्या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून त्यांचा मार्गच बंद होतो आणि एखाद्या बेटावर राहणाऱ्या वस्तीसारखी त्यांची अवस्था होते. आज मोबाईल फोनसारखी संपर्क यंत्रणा काही तास ठप्प झाली तर शहरी माणूस अस्वस्थ होतो, तिथे या गावांमधील लोक कोणत्याही संपर्क माध्यमांशिवाय कसे जगत असतील? याची कल्पना त्या गावात गेल्याशिवाय येणार नाही.

प्रशासनाच्या वतीने पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी लागणारे रेशनचे धान्य, औषधीसाठा त्या संपर्क तुटणाºया गावांमध्ये आधीच पोहोचविला जातो. पण बारमारी संपर्क आणि दळणवळण कायम राहावे म्हणून नाल्यांवर पुलाची उभारणी करणे प्रशासकीय यंत्रणेला का शक्य होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. नक्षलवादी कामांवर अडथळे आणतात हे खरे असले तरी इतका मोठा पोलीस बंदोबस्त दिमतीला आहे त्याचा वापर अशावेळी योग्य पद्धतीने करून पुलांची उभारणी करणे अशक्य नाही, फक्त इच्छाशक्तीची आणि तळमळीची गरज आहे.

आजही या जिल्ह्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये चारचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता नाही. आजारी रुग्ण, गर्भवती महिलांना अनेक किलोमीटरची पायपीट करत, खाटेचा पाळणा करून आणावे लागते. पावसाच्या दिवसात तर रुग्णाला गावाबाहेरही निघता येत नाही आणि त्यातून दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. अनेक जण पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात वाहून जातात. परंतू त्यांच्या परिस्थितीत बदल होत नाही. असे किती दिवस त्यांनी कसरत करत जगायचे आहे? याचे उत्तर देण्यासाठी कुणीतरी पुढे येणे गरजेचे आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली