गडचिरोली, धानोरात हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ
By Admin | Updated: December 15, 2015 03:31 IST2015-12-15T03:31:21+5:302015-12-15T03:31:21+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व अतिक्ति जिल्हा शल्य

गडचिरोली, धानोरात हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ
गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व अतिक्ति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना प्रत्यक्ष गोळ्या वाटप करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शहरी भागातील नागरिकांनी हत्तीरोग निर्मूलनासाठी डीईसी व अॅल्बनडाझोल गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले. यावेळी जिल्हा कीटकजन्य आजार सल्लागार राजेश कार्लेकर, नैताम, बारसागडे, भाकरे, शर्मा, राहुल बर्डे, गीता डोंगरे, रोशनी खोब्रागडे, आशा नंदेश्वर आदींसह बहुसंख्य आरोग्य कर्मचारी व प्रशिक्षणार्थी आरोग्यसेविका उपस्थित होत्या.
धानोरा - धानोरा येथे आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगराध्यक्ष वर्षा चिमुरकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती मंगला मडावी, धानोराचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साबणे, गोडलवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा पाटील, धानोरा येथील हत्तीरोग निरीक्षक, ए. पी. एडलावार आदी उपस्थित होते. यावेळी पुरूष व महिलांना हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधित महिलांकडून गोळ्या सेवन करण्यात आल्या. हत्तीरोग निर्मूलनासाठी औषधोपचारावर भर द्यावा, असे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष वर्षा चिमूरकर यांनी केले. यावेळी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी हत्तीरोग आजाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन हत्तीरोग निरीक्षक एडलावार यांनी केले तर आभार गटप्रवर्तक कोयते यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)