युवक काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने
By Admin | Updated: January 9, 2016 01:48 IST2016-01-09T01:48:53+5:302016-01-09T01:48:53+5:30
आसाम येथील काँग्रेस कार्यकर्त्यांवर भाजप सरकार व भाजप कार्यकर्त्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला.

युवक काँग्रेसची गडचिरोलीत निदर्शने
गडचिरोली : आसाम येथील काँग्रेस कार्यकर्त्यांवर भाजप सरकार व भाजप कार्यकर्त्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. तसेच पुणे येथील एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात शुक्रवारी सकाळी ११ वाजता भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. याप्रसंगी पंकज गुड्डेवार, लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनिकांत मोटघरे, शंकरराव सालोटकर, नंदू वाईलकर, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, दर्शना लोणारे, अमोल भडांगे, नीलेश राठोड, गौरव अलाम, राकेश गणवीर, तौफीक शेख, कमलेश खोब्रागडे, केवलराम नंदेश्वर, अमर नवघडे, हेमंत शेंडे, लिला मोटघरे, प्रतिक बारशिंगे, महेश झिलेवार, शाहरूख शेख, मोहसीन कुरेशी, शहाबाज शेख, विवेक कोटगले, मोना कुरेशी, सोनू पठाण, शुभम बंडीवार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)