मापिसा कायद्याविरोधात काँग्रेसचे गडचिरोलीत निदर्शने

By Admin | Updated: September 1, 2016 01:41 IST2016-09-01T01:41:47+5:302016-09-01T01:41:47+5:30

राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा विरोध

Gadchiroli demonstrations against MPISA laws | मापिसा कायद्याविरोधात काँग्रेसचे गडचिरोलीत निदर्शने

मापिसा कायद्याविरोधात काँग्रेसचे गडचिरोलीत निदर्शने

राज्य सरकारचा केला निषेध : शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर
गडचिरोली : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या नवीन महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट २०१६ (मापिसा) या कायद्याचा विरोध करण्यासाठी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोलीत जोरदार निदर्शने करुन राज्य सरकारचा निषेध केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. ‘मापिसा’ कायदा हा केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तसेच शासनाच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध होत असलेल्या जनआंदोलनावर अंकूश ठेवून हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा आरोप माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी यावेळी केला.
या कायद्यामुळे शंभर किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊन कार्यक्रम घ्यावयाचा असल्यास पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. तसेच सुरक्षिततेची जबाबदारी आयोजकांवर राहील. ही बाब लक्षात घेता लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, वाढदिवस यासारख्या घरगुती कार्यक्रमांवरही बंधने येणार आहेत. शिवाय पोलिसांवर टीका करता येणार नाही आणि कोणत्याही परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीची झडती घेण्याचे अधिकार पोलिसांना राहतील. तसेच पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईविरुद्ध न्यायालयात दादही मागता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते. एकंदरित हा कायदा जुलमी व गोरगरीब नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी लागू केला जात असून, काँग्रेस पक्ष तो लागू करु देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गुड्डेवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, जिल्हा सचिव प्रभाकर वासेकर, रोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, जिल्हा सचिव एजाज शेख, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष नंदू वाईलकर, एनएसयूआयचे अध्यक्ष नीतेश राठोड, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, सी.बी.आवळे, पुरुषोत्तम मसराम, रामचंद्र गोटा, पं. स. सदस्य अमिता मडावी, सुभाष धाईत, बाशिद शेख, दिलिप घोडाम, उमेश कुळमेथे, कुणाल पेंदोरकर, बाळू मडावी, मिलिंद बागेसर, आरिफ कनोजे, कमलेश खोब्रागडे, नितीन पिपरे, बंटी राठोड, राकेश रत्नावार, हिरानंद शेळके, राकेश गणवीर, दादाजी मेश्राम, नगरसेविका पुष्पा कुमरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे, आरती कंगाले, निशा गेडाम, रेखा खोब्रागडे, विजय भांडेकर, हेमंत भांडेकर, शोभा वाळके, संगीता सोनुले, मीरा निंदेकर, गीता पित्तुलवार, ज्योती गव्हाणे, वर्षा गुलदेवकर, दिवाकर निसार, भूषण भैसारे, मिलिंद किरंगे, लोकेश राऊत आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Gadchiroli demonstrations against MPISA laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.