गडचिरोली, अहेरीत काँग्रेसचे धरणे
By Admin | Updated: December 1, 2014 22:53 IST2014-12-01T22:53:01+5:302014-12-01T22:53:01+5:30
जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने

गडचिरोली, अहेरीत काँग्रेसचे धरणे
लढा कायम ठेवणार : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनावर प्रखर टीका
गडचिरोली/अहेरी : जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या धानाला भाव, देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग रोजगार आदी मुद्यांवर जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व तालुका काँग्रेस कमिटी अहेरीच्यावतीने आज सोमवारला गडचिरोली व अहेरी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य शासनावर प्रखर टिका केली.
जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, शेतकऱ्यांच्या धानाला ३५०० व ५०० रूपये बोनस देण्यात यावा, जिल्हा विकास प्राधिकरण कार्यान्वित करण्यात यावे, देसाईगंज-गडचिरोल रेल्वे मार्ग निर्माण करण्यात यावे, खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आज सोमवारला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, प्रदेश सदस्य पंकज गुड्डेवार, लोकनेते नामदेवराव गडपल्ल्लीवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, नगरसेवक नंदू वाईलकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, मनोहर पोरेटी, सतिश विधाते, अमिता मडावी, विनोद दशमुखे, सोनटक्के, काशिनाथ भडके, दिवाकर निसार, तुळशीराम भोयर, लक्ष्मण कोवे, बाबुराव कुंभारे, पी.टी. मसराम, दर्शना मेश्राम, दर्शना लोणारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अहेरी येथील धरणे आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष मेहबूब अली यांनी केले. यावेळी शिला चौधरी, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष व्यंकटेश चिलनकर, युवक काँगे्रसचे अहेरी विधानसभा उपाध्यक्ष बालाजी गेडाम, सुरेश मडावी, मधुकर तुंगावार, अशोक आलाम, बब्बू शेख, सलिम शेख, अर्जुन कांबळे, राबीया शेख, इमरान खान, सदाशिव गरगम, सदाशिव दुर्गे, साई पुगलम, मधुकर गोंगले, साई कुकुडकर, निवृत्ती दुर्गे, मुत्यालू कांबळे, शंकरी काटेल, मिना मेश्राम, सुनिता चौधरी, जक्कू कोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राज्याला दुष्काळग्रस्त घोषीत करून दर हेक्टरी २५ हजार रूपयाची आर्थिक मदत द्यावी व सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी मेहबूब अली यांनी भाषणातून केली. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. (प्रतिनिधी)