गडचिरोलीत पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक; एक महिला नक्षली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 16:11 IST2019-07-29T15:24:34+5:302019-07-29T16:11:53+5:30
२८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी पोलीस व नक्षल्यांत चकमक उडून तीत एक नक्षली ठार झाल्याची घटना येथे सोमवारी दुपारी घडली.

गडचिरोलीत पोलीस व नक्षलवाद्यांत चकमक; एक महिला नक्षली ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी पोलीस व नक्षल्यांत चकमक उडून तीत एक महिला नक्षली ठार झाल्याची घटना येथे सोमवारी दुपारी घडली.
जिल्ह्यात नक्षलसप्ताहाचे आवाहन नक्षल्यांनी केले आहे. या दरम्यान काही घातपाताच्या घटना होऊ नयेत यासाठी शासनाने येथील बसफेऱ्याही बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या बंददरम्यान पोलिसांची गस्त तुकडी जंगलातून जात असताना, अचानक दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्याला तात्काळ प्रत्युत्तर दिले. या प्रतिहल्ल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. घटनास्थळाचा शोध घेताना पोलिसांना एका महिला नक्षल्याचा मृतदेह आढळून आला आहे.