भक्तीरसात न्हाऊन निघाले गडचिरोली शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:46 IST2017-11-09T23:44:30+5:302017-11-09T23:46:00+5:30
भगवद्गीतेतील संदर्भ देत जीवनात आचरणात आणण्याच्या चांगल्या गोष्टींची शिकविण देणाºया भागवत कथा ज्ञानयज्ञाचा गुरूवारी मोठ्या उत्साहात ....

भक्तीरसात न्हाऊन निघाले गडचिरोली शहर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भगवद्गीतेतील संदर्भ देत जीवनात आचरणात आणण्याच्या चांगल्या गोष्टींची शिकविण देणाºया भागवत कथा ज्ञानयज्ञाचा गुरूवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात समारोप झाला. यावेळी ७ ते ८ हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत अशा पद्धतीच्या भव्य स्वरूपात भागवत कथा महायज्ञाचे आयोजन नगराध्यक्ष योगिता पिपरे व नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्या पुढाकाराने केले होते. २ ते ८ नोव्हेंबर असे सात दिवस राजारामजी काबरा स्मृति सभागृहाच्या प्रांगणात झालेल्या कथायज्ञाचे पं.विनोद बिहारी गोस्वामी यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रवण करण्यासाठी दररोज ५ हजारावर नागरिक हजेरी लावत होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवापासून तर कृष्ण-सुदाम्यातील मैत्रीपर्यंत अनेक प्रसंग विशेष आकर्षण ठरले.
गडचिरोलीच नाही तर बाहेर गावावरूनही अनेक लोक भागवत कथा ऐकण्यासाठी दररोज येत होते. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरणाची अनुभती येत होती. जीवन जगताना स्वार्थ आणि परमार्थ यातील भेद स्पष्ट करून गरीब-श्रीमंती, मानवी स्वभावातील दुर्गुणांवर मात करून चांगल्या संगतीने आयुष्य कसे सार्थकी लावता येते हे पं.गोस्वामी यांनी उदाहरणासह पटवून दिले. या सुश्राव्य कथेत सर्वजण दररोज ४ तास रममाण होत होते.
असे भव्य आयोजन गडचिरोलीत केल्याबद्दल अनेकांनी पिपरे दाम्पत्याचे आभार व्यक्त केले. संपूर्ण कथा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी राधेश्याम काबरा, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, न.प.चे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड, शालीग्राम विधाते, अनिल म्हशाखेत्री, प्रकाश बारसागडे, अमोल दशमुखे, नरेंद्र माहेश्वरी, प्रवीण मुक्तावरम, नगरसेवक काटवे, डॉ.कुंभारे आदी अनेकांनी परिश्रम घेतले.
नेटके व शिस्तबद्धपणे झालेले अशा प्रकारचे आयोजन वारंवार गडचिरोली जिल्ह्यात व्हावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.