Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार
By गेापाल लाजुरकर | Updated: August 14, 2023 23:02 IST2023-08-14T23:01:39+5:302023-08-14T23:02:00+5:30
Gadchiroli: मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले.

Gadchiroli: लाच स्वीकारणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात, ट्रॅक्टरमालकाकडून घेतले १२ हजार
- गाेपाल लाजूरकर
गडचिराेली - मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना पकडलेले ट्रॅक्टर कारवाई न करता साेडून देण्याचा माेबदला म्हणून १५ हजारांपैकी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वडधा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेमवारी रंगेहात पकडले. ही कारवाई १४ ऑगस्ट राेजी वडधा येथे करण्यात आली. रमेश महागू कवडाे (३२ वर्षे) तलाठी साजा क्रमांक १५ वडधा, मंडळ कार्यालय देऊळगाव तालुका आरमाेरी, असे लाच प्रकरणात अडकलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
या प्रकरणात तक्रारदाराच्या मालकीचे ट्रॅक्टर डार्ली येथील खाणीतून मुरमाची अवैधरित्या वाहतूक करताना आराेपी लाेकसेवक तलाठी रमेश कवडाे याने ट्रॅक्टर पकडून पंचनामा करून साेडून दिल्याचा माेबदला म्हणून १५ हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. एसीबीने सापळा रचला. त्यानंतर १४ ऑगस्ट राेजी तलाठी कवडाे याच्याच कक्षात तडजाेडीअंती १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आराेपी कवडाे याच्याविराेधात आरमाेरी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक श्रीधर भाेसले यांच्या पर्यवेक्षणात पाेलिस निरीक्षक शिवाजी राठाेड, पाेलिस हवालदार नत्थू धाेटे, पाेलिस नाईक स्वप्निल बांबाेळे, पाेलिस शिपाई किशाेर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घाेरमाेडे, प्रफुल्ल डाेर्लीकर आदींनी केली.
ताडूरवार नगरातील घराची झडती
वडधा साजाचे तलाठी कवडाे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर आरमाेरी येथील ताडूरवान नगरच्या त्यांच्या भाड्याच्या खाेलीत एसीबीच्या चमूकडून झडती घेण्यात आली.