गडचिरोली ‘मेक इन इंडिया’चा भाग बनणार - हंसराज अहीर
By Admin | Updated: December 27, 2014 22:50 IST2014-12-27T22:50:53+5:302014-12-27T22:50:53+5:30
केंद्र शासनाने मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग स्थापन केले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज

गडचिरोली ‘मेक इन इंडिया’चा भाग बनणार - हंसराज अहीर
गडचिरोली : केंद्र शासनाने मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग स्थापन केले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
केंद्रीय मंत्री बनल्यानंतर हंसराज अहीर यांनी गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच भेट दिली. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थानिक केमिस्ट भवन येथे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जि.प. सदस्य वर्षा कौशिक, प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, प्रकाश गेडाम, रविंद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, रेखा डोळस, प्रकाश अर्जुनवार, डॉ. शिवनाथ कुंभारे, नंदू काबरा, सदानंद कुथे, अनिल पोहोनकर, गोवर्धन चव्हाण यांच्यासह जिल्हाभरातील भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सत्कार कार्यक्रमादरम्यान विविध संघटनांच्यावतीने जिल्ह्यातील समस्या संदर्भात निवेदन दिले. आपण या क्षेत्राचे नेतृत्व केले असल्याने समस्या अवगत असून या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. संचालन प्रशांत वाघरे तर आभार प्रशांत भृगूवार यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)