शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Gadchiroli: कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार, दोन आरोपींना दहा वर्षांची शिक्षा

By संजय तिपाले | Updated: May 17, 2024 19:15 IST

Gadchiroli News: पदवीचे शिक्षण घेणारी २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती.

- संजय तिपाले गडचिरोली - पदवीचे शिक्षण घेणारी २३ वर्षीय विद्यार्थिनीच्या विद्यार्थिनीवर कॉलेजला जाताना वाटेत दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना सहा वर्षांपूर्वी कुरखेडा तालुक्यात घडली होती. या प्रकरणात १७ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दाेन्ही आरोपींना दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास व पाऊणे तीन लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

प्रशांत उत्तम जोगे (३२) व रवींद्र सुमराज मडावी (२५, दोघे रा. बेलगाव ता. कुरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित २३ वर्षीय मुलगी सायकलवरुन गावातून कुरखेडा येथे कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायची. ३ मार्च २०१८ रोजी ती नित्याप्रमाणे सायकलवरुन जात होती. वाटेत प्रशांत जोगे व रवींद्र मडावी यांनी दुचाकीवरुन येऊन सायकलला धडक दिली. ती खाली कोसळताच दोघांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्त्याने घेऊन गेले. रस्त्यापासून ५० मीटर अंतरावर जंगल परिसरात दुपारी १२ ते साडेबारा दरम्यान तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडितेने तीव्र विरोध केला तेव्हा रवींद्र मडावीने तिचे हातपाय पकडले व प्रशांत जाेगे याने टोकदार वस्तूने तिला जखमी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर तिच्याशी कुकर्म केले. ७ मार्च २०१८ रोजी कुरखेडा ठाण्यात बलात्कार, विनयभंग, मारहाण आदी कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर व उपनिरीक्षक विजय वनकर यांनी तपास करुन

दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.विशेष जिल्हा व सत्र न्या. उत्तम एम. मुधोळकर यांनी साक्षीपुरावे व जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. त्यांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व २ लाख ७४ रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितेला देण्याबाबत आदेशात नमूद आहे. ...अन् पीडितेने केली स्वत:ची सुटकायाची वाच्यता केल्यास आई- वडील यांना ठार करु, अशी धमकी दिली. यानंतर रवींद्रनेही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगावरील कपडे फाडत असताना तिने दोघांच्या तावडीतून निसटून पळ काढला. याचवेळी रस्त्यावरुन एक मुलगी दुचाकीवरुन जात होती. तिला हात करुन पीडित मुलगी घरापर्यंत पोहोचली. वैद्यकीय अहवाल ठरला महत्त्वाचाया प्रकरणात वैद्यकीय अहवाल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जबाब महत्त्वाचा ठरला. जिल्हा सरकारी वकिल अनिल एस. प्रधान यांनी न्यायालयापुढे सक्षमपणे बाजू मांडली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय