गडचिरोलीतील कलावंत नागपुरात चमकले
By Admin | Updated: March 29, 2016 02:47 IST2016-03-29T02:47:04+5:302016-03-29T02:47:04+5:30
नागपूर येथील स्वरसंगम सांस्कृतिक मंच यांच्या वतीने विदर्भस्तरीय शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, वादन स्पर्धा घेण्यात

गडचिरोलीतील कलावंत नागपुरात चमकले
गडचिरोली : नागपूर येथील स्वरसंगम सांस्कृतिक मंच यांच्या वतीने विदर्भस्तरीय शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, वादन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गडचिरोली येथील कलावंतांनी आपली छाप सोडत अनेक बक्षिसे पटकावली.
या स्पर्धेत विदर्भातील शेकडो कलावंत सहभागी झाले होते. या स्पर्धेत तुषार मानकर याने परम् गहण हे नाट्यसंगीत सादर केले. त्याला द्वितीय पारितोषिक देण्यात आले. यामिनी पेंदाम हिने प्रथम क्रमांक पटकाविला. आकाश अंबादे याने प्रोत्साहनपर बक्षीस मिळविले. स्वप्नील भोसले या तबलावादकाने उपस्थित मान्यवर तसेच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्वर संगम सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष किशोर होळी यांनी गडचिरोलीचे प्रतिनिधी संजय धात्रक यांच्या कार्याचा गौरव केला. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील कलावंतांनी उत्कृष्ट कला सादर केल्याबद्दल उपस्थित कलावंतांचे मान्यवरांनी कौतुक केले. (नगर प्रतिनिधी)