शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली व आरमोरीत चार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 25, 2014 23:22 IST

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन

गडचिरोली : घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन पत्र दाखल केले आहे. २० सप्टेंबरपासून आजपर्यंत ३ विधानसभा क्षेत्रात २३७ उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याची माहिती गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे. ६७ गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आज भारतीय जनता पक्षातर्फे म्हणून डॉ. देवराव मादगुजी होळी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून नारायण दिनबाजी जांभुळे यांनी व भाजप तर्फे तसेच अपक्ष म्हणून चातगावचे सरपंच गोपाल लक्ष्मण उईके यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे हिरालाल गोविंदा येरमे यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. अहेरी विधानसभा क्षेत्रात अद्याप एकही नामांकन पत्र दाखल झालेले नाही. आज पाचव्या दिवशी आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १० उमेदवारांनी २३ अर्ज, अहेरी विधानसभा क्षेत्रात ७ उमेदवारांनी २० अर्ज खरेदी केले आहे. आतापर्यंत आरमोरी क्षेत्रात २४ उमेदवारांनी ९२, गडचिरोली क्षेत्रात २९ उमेदवारांनी ८० तर अहेरी क्षेत्रात २५ उमेदवारांनी ६५ अर्ज खरेदी केले आहे. नामांकन पत्र दाखल करण्याला अवघ्या दोन दिवसाचा कालावधी उरला आहे. उद्या शुक्रवारी व शनिवारी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या दोन दिवसात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोली, आरमोरी व अहेरी उपविभागीय कार्यालयात उमेदवारांचे गर्दी उसळणार आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्यावतीने नामांकन पत्र सादर करताना चित्रीकरण केल्या जात आहे.