गडचिरोली व आरमोरीत चार उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: September 25, 2014 23:22 IST2014-09-25T23:22:47+5:302014-09-25T23:22:47+5:30

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन

Gadchiroli and Saramora have filed nominations for four nominations | गडचिरोली व आरमोरीत चार उमेदवारी अर्ज दाखल

गडचिरोली व आरमोरीत चार उमेदवारी अर्ज दाखल

गडचिरोली : घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज नामांकन पत्र दाखल करण्याचाही श्री गणेशा गडचिरोली जिल्ह्यात झाला. गडचिरोली विधानसभेसाठी आज ३ तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात एका उमेदवाराने नामांकन पत्र दाखल केले आहे. २० सप्टेंबरपासून आजपर्यंत ३ विधानसभा क्षेत्रात २३७ उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याची माहिती गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
६७ गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आज भारतीय जनता पक्षातर्फे म्हणून डॉ. देवराव मादगुजी होळी यांनी एक अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार म्हणून नारायण दिनबाजी जांभुळे यांनी व भाजप तर्फे तसेच अपक्ष म्हणून चातगावचे सरपंच गोपाल लक्ष्मण उईके यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे हिरालाल गोविंदा येरमे यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. अहेरी विधानसभा क्षेत्रात अद्याप एकही नामांकन पत्र दाखल झालेले नाही. आज पाचव्या दिवशी आरमोरी विधानसभा क्षेत्रात ७ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १० उमेदवारांनी २३ अर्ज, अहेरी विधानसभा क्षेत्रात ७ उमेदवारांनी २० अर्ज खरेदी केले आहे. आतापर्यंत आरमोरी क्षेत्रात २४ उमेदवारांनी ९२, गडचिरोली क्षेत्रात २९ उमेदवारांनी ८० तर अहेरी क्षेत्रात २५ उमेदवारांनी ६५ अर्ज खरेदी केले आहे. नामांकन पत्र दाखल करण्याला अवघ्या दोन दिवसाचा कालावधी उरला आहे. उद्या शुक्रवारी व शनिवारी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येत्या दोन दिवसात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गडचिरोली, आरमोरी व अहेरी उपविभागीय कार्यालयात उमेदवारांचे गर्दी उसळणार आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्यावतीने नामांकन पत्र सादर करताना चित्रीकरण केल्या जात आहे.

Web Title: Gadchiroli and Saramora have filed nominations for four nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.