लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आलापल्लीकडे जात असलेले एक खासगी प्रवासी वाहन अनियंत्रित होऊन उलटल्याने झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.येरागड्डा फाट्याजवळ या खासगी वाहनासमोर आलेल्या ट्रकला चुकविण्याच्या प्रयत्नात हे वाहन अनियंत्रित झाल्याचे सांगण्यात येते. या वाहनात एकूण १३ प्रवासी होते. त्यात बरीच शाळकरी मुले आलापल्ली येथे जात होती. तेथून ती बस पकडून चामोर्शी तालुक्यातील आश्रमशाळेत जाणार होती. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सर्व प्रवाशांना अहेरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
गडचिरोलीत अपघात; दोन शाळकरी मुलांसह ४ जण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 11:49 IST