गडचिराेलीत खांदेपालट तर देसाईगंजात जुन्यांनाच संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:41+5:302021-01-13T05:35:41+5:30

गडचिराेली, देसाईगंज : नगर परिषदेच्या सभापतीपदांची निवडणूक साेमवारी (दि. ११) पार पडली. गडचिराेली नगर परिषदेत नवीन चेहऱ्यांना सभापती बनण्याची ...

In Gadchiraeli, there is a change of shoulders, while in Desaiganj, only the old have a chance | गडचिराेलीत खांदेपालट तर देसाईगंजात जुन्यांनाच संधी

गडचिराेलीत खांदेपालट तर देसाईगंजात जुन्यांनाच संधी

गडचिराेली, देसाईगंज : नगर परिषदेच्या सभापतीपदांची निवडणूक साेमवारी (दि. ११) पार पडली. गडचिराेली नगर परिषदेत नवीन चेहऱ्यांना सभापती बनण्याची संधी मिळाली, तर देसाईगंज नगर परिषदेत महिला व बालकल्याण सभापती वगळता इतर पाच सभापतीपदी जुन्याच पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले. दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे.

गडचिराेली नगर परिषदेत बांधकाम सभापतीपदी प्रवीण वाघरे, आराेग्य सभापतीपदी अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापती वर्षा नैताम तर वित्त व नियाेजन सभापतीपदी प्रशांत खाेब्रागडे यांची वर्णी लागली आहे. हे चारही नवीन चेहरे आहेत. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी पूजा बाेबाटे यांनी नामांकन भरण्याचा प्रयत्न केला. मात्र सूचक व अनुमाेदकासाठी नामांकनावर नगरसेवकांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. सूचक व अनुमाेदक यांच्या स्वाक्षरीशिवाय असलेले नामांकन स्वीकारण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे महिला व बालकल्याण सभापतीपद रिक्त आहे. विशेष म्हणजे गडचिराेली नगर परिषदेतील एकूण २५ सदस्यांपैकी २३ सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत. पूजा बाेबाटे यासुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आहेत. असे असताना एकाही नगरसेवकाने त्यांच्या नामांकनावर सूचक व अनुमाेदक म्हणून स्वाक्षरी केली नाही. यावरून गडचिराेली नगर परिषदेत नगरसेवकांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट हाेत आहे.

सभापतींची निवडणूक पार पडल्यानंतर जल्लाेष करण्यात आला. या वेळी खासदार अशाेक नेते, आ. डाॅ. देवराव हाेळी, नगराध्यक्ष याेगिता पिपरे, बाबूराव काेहळे, गाेविंद सारडा आदी पदाधिकारी हजर हाेते.

देसाईगंज नगर परिषदेत महिला व बालकल्याण सभापती वगळता जुन्याच सभापतींना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्या समित्या बदलण्यात आल्या. महिला व बालकल्याण सभापतीपदी अश्विनी कांबळे यांच्या जागी रिता ठाकरे यांची वर्णी लागली आहे. महिला व बालकल्याण उपसभापती हे पद नव्याने तयार करण्यात आले असून या जागेवर फमिदा शेख यांची वर्णी लावण्यात आली. पाणीपुरवठा सभापतीपदी किशन नागदेवे, बांधकाम सभापतीपदी माेतीलाल कुकरेजा, आराेग्य सभापतीपदी सचिन खरकाटे, तर शिक्षण सभापती म्हणून दीपक झरकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.

देसाईगंजात पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी काम पाहिले. नवनियुक्त बालकल्याण सभापती रिता ठाकरे व उपसभापती फमिदा शेख यांचे नगर परिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

बाॅक्स....

चार वर्षांनंतर बांधकाम सभापती बदलले

२५ सदस्य संख्या असलेल्या गडचिराेली नगर परिषदेत २१ नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. अपक्ष निवडून आलेल्या प्रशांत खाेब्रागडे व माधुरी खाेब्रागडे यांनीसुद्धा भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे भाजपच्या एकूण नगरसेवकांची संख्या २३ झाली. प्रत्येकाला पद देण्याच्या उद्देशाने प्रत्येक नगरसेवकाला सभापती बनण्याची संधी दिली जाईल, असे आश्वासन भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले हाेते. त्यानुसार दरवर्षी सभापती बदलून नवीन सदस्याला संधी दिली जात हाेती. मात्र मागील चार वर्षांपासून बांधकाम सभापतीपदी आनंद शृंगारपवार पद सोडायला तयार नव्हते. या वेळी तरी त्यांचे सभापतीपद बदलविण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात हाेती. त्यामुळे त्यांच्याकडून सभापतीपद काढून प्रवीण वाघरे यांना संधी देण्यात आली.

Web Title: In Gadchiraeli, there is a change of shoulders, while in Desaiganj, only the old have a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.