भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; दोन जागीच ठार

By Admin | Updated: March 21, 2016 01:12 IST2016-03-21T01:12:59+5:302016-03-21T01:12:59+5:30

लग्नाच्या पत्रिका वाटप करून वैरागडवरून ठाणेगावमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास वैरागडकडे जाणाऱ्या

Furious Tipper's bicycle hit; Two killed on the spot | भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; दोन जागीच ठार

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; दोन जागीच ठार

आरमोरी : लग्नाच्या पत्रिका वाटप करून वैरागडवरून ठाणेगावमार्गे गडचिरोलीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास वैरागडकडे जाणाऱ्या भरधाव टिप्परने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. सदर घटना ठाणेगावजवळ वैरागड मार्गावर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून टिप्पर चालक फरार झाला. गिरीधर शिवराम कांबळे (२७) रा. कोटगल व विद्या देवराव मेश्राम (१३) रा. देलोडा असे मृतकांची नावे आहेत. तर दिशा रतन मेश्राम रा. वासाळा ही मुलगी गंभीर जखमी झाली.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोलीलगतच्या कोटगल येथील गिरीधर कांबळे यांचे आरमोरीच्या ताडुरवार नगरातील एका मुलीशी विवाह ठरला असून सदर विवाह ११ एप्रिल २०१६ रोजी आयोजित करण्यात आला होता. शनिवारी लग्न सोहळ्याचे कपडे खरेदी करून लग्नाच्या पत्रिका वाटप केल्यानंतर वैरागड येथून ठाणेगाव मार्गे गिरीधर कांबळे हे आपल्या नव्या दुचाकीने विद्या मेश्राम व दिशा मेश्राम या दोन मुलींना सोबत घेऊन जात होता. दरम्यान ठाणेगावरून वैरागडकडे डांबर घेऊन जाणाऱ्या एसकेएम कंपनीच्या एमएच ३१ डब्ल्यू ५३८६ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने दुचाकीला जबर धडक दिली. टिप्परने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात गिरीधर कांबळे व विद्या मेश्राम दोघे जण घटनास्थळीच ठार झाले. तर दिशा मेश्राम ही गंभीर जखमी झाली असून तिला आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आरमोरीचे पोलीस उपनिरिक्षक बच्चलार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैवाहिक जीवनाचे स्वप्न बघून लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Furious Tipper's bicycle hit; Two killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.