‘बार्टी’प्रमाणे इतरही संशाेधन व प्रशिक्षण संस्थांना निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST2021-06-29T04:24:52+5:302021-06-29T04:24:52+5:30
इयत्ता १० वीमध्ये ९० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्वायत्त संस्था बाबासाहेब आंबेडकर संशोधन ...

‘बार्टी’प्रमाणे इतरही संशाेधन व प्रशिक्षण संस्थांना निधी द्या
इयत्ता १० वीमध्ये ९० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत स्वायत्त संस्था बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुसूचित जातीतील गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पूर्वपरीक्षेच्या तयारीकरिता हे अनुदान लाभदायक ठरू शकते. त्याच धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था, महात्मा जाेतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आदींना शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा तसेच अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, खुल्या प्रवर्गातील इयत्ता १० वीमध्ये ९० टक्के गुण मिळविलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान देण्याची सुरुवात याच सत्रापासून करावी, अशी मागणी विवेक सहारे यांनी शासनाकडे केली आहे.