लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन- चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जिल्हा दौऱ्यात यासंदर्भात नुकताच आढावा घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित करत निधी मंजुरीची जोरदार मागणी केली होती.
पूल बांधकाम प्रकल्पएटाप्पली येथे राज्य मार्ग ३८० वर दोन पूल बांधण्यात येणार आहेत. एकासाठी २७ कोटी तर दुसऱ्या पुलासाठी ५५ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. यासोबतच कमलापूर-दमरंचा-मन्येराजाराम-ताडगाव-कांडोली रस्त्यावर बांडिया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम याकरिता सुमारे ३ कोटी मंजूर झाले आहेत.
लंबीया नदीवरील पूल व संरक्षण २ भिंत बांधकामाकरिता २ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. झिंगानूर-वादाडेली-येडसिली-कल्लेड-कोजेड-डेचाळी रस्त्यावर येडरंगा वेगू नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकामासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले. या माध्यमातून दुर्गम भागातील दळणवळणाला गती मिळणार आहे.
विकासाला चालना मिळेल : जिल्हाधिकारी पंडामुख्यमंत्री, सहपालक मंत्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या या निधीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पूल प्रकल्पांना गती मिळणार आहे. स्थानिकांना याचा मोठा फायदा होईल. तसेच वाहतूक सोयीस्कर होणार असून नक्षलग्रस्त भागातील विकासालाही चालना मिळेल, असे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा म्हणाले.
कोणत्या रस्त्यासाठी किती निधीची तरतूद
- चंद्रपूर-लोहारा-घंटाचौकी-मुल-हरंग-चामोर्शी-घोट-मुलचेरा-अहेरी-वेंकटरापू र-बेजूरपल्ली ते राज्य मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण मंजूर रक्कम : २०० कोटी
- मुधोली-लक्ष्मणपूर-येणापूर-सुभाषग्राम रस्त्याचे मजबुतीकरण मंजूर रक्कम : ११५ कोटी
- परवा-केळापूर-वणी-वरुड-नागभीड-ब्रह्मपुरी-वडसा-कुरखेडा-कोर्ची ते राज्य सीमा राज्य मार्ग रस्त्याचे मजबुतीकरण मंजूर रक्कम : ९४ कोटी २१ लाख