संपूर्ण जागा हडपण्याचा डाव

By Admin | Updated: April 8, 2016 01:21 IST2016-04-08T01:21:41+5:302016-04-08T01:21:41+5:30

राखी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या सर्वे क्र. २ मधील ०.७६ आर क्षेत्रफळ जागेवर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन करून संपूर्ण जागा हडपण्याचा प्रयत्न गावातील काही नागरिकांकडून चालविला जात आहे.

Full space grab | संपूर्ण जागा हडपण्याचा डाव

संपूर्ण जागा हडपण्याचा डाव

गडचिरोली : राखी ग्रामपंचायतीची मालकी असलेल्या सर्वे क्र. २ मधील ०.७६ आर क्षेत्रफळ जागेवर भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन करून संपूर्ण जागा हडपण्याचा प्रयत्न गावातील काही नागरिकांकडून चालविला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी राखीच्या उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांच्यासह शेकडो नागरिकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केली.
राखी येथे बाजारासाठी ०.७६ हेक्टर आर जागा १९२२ पासून आरक्षित करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण जागेवर काही नागरिकांनी ९ मार्च २०१६ रोजी तारेचे कुंपन करून १२ मार्च २०१६ च्या रात्री बेकायदेशिररित्या बुद्ध मूर्तीची स्थापना केली. हा सर्व प्रकार अवैध असल्याने गावातील प्रमुख व्यक्ती या नात्याने उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांनी सदर अतिक्रमण जिल्हाधिकारी यांना १५ मार्च रोेजी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले. सदर जागा बाजारासाठी राखीव असल्याचा सातबारा आहे. राखी गाव विहीरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येते. राखी गावाच्या जागेवर गुरवळा येथील जनता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. चक्रपाणी रायपुरे, गुरूदास सेमस्कर, रमेश तुरे, योगीता बांबोळे हे गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, त्याचबरोबर या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच विद्या विनोद सातपुते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य धनराज भांडेकर, शशिकला मादमवार, भक्तदास नवघरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला पीतांबर येलके, अशोक वासेकर, मनोज कुनघाडकर, देविदास फाफणवाडे, हिराजी नैताम, रामदास किरमिरे, रमेश सातपुते, खुशाल खोब्रागडे, दिलीप बोदलकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Full space grab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.