शालेय याेजनांमध्ये वारंवार बदल; मुख्याध्यापकांना बॅंक शाेधण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:40 IST2021-09-26T04:40:02+5:302021-09-26T04:40:02+5:30
सर्व शिक्षा अभियानासह शालेय पोषण आहार, ४ टक्के सादिल योजना व समाज सहभाग अशा अन्य योजनांचे खाते काढावे मुख्याध्यापकांना ...

शालेय याेजनांमध्ये वारंवार बदल; मुख्याध्यापकांना बॅंक शाेधण्याची वेळ
सर्व शिक्षा अभियानासह शालेय पोषण आहार, ४ टक्के सादिल योजना व समाज सहभाग अशा अन्य योजनांचे खाते काढावे मुख्याध्यापकांना काढावे लागते. या सर्व खात्यांचा विचार करून मुख्याध्यापक खाते काढतात. सध्या खाते असलेल्या बँकेत आरटीजीएस सुविधा उपलब्ध आहेत. शाळेपासून लगतच्या अंतरावर असणाऱ्या बँकेत खाते सोयीचे असून आता संपर्काच्या बँकेत नव्याने खाते काढण्याचे धोरण मुख्याध्यापकांना पचनी पडणारे नाही. शिक्षण विभागाने बॅंक बदलण्याचे कारण कधीच समजले नाही.
बाॅक्स
कामांचा ताण वाढला
जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या प्राथमिक शाळेत लिपिक किंवा अन्य शिक्षकच मुख्याध्यांपकाचा प्रभार सांभाळतात. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद ग्रामीण भागात शेतकरी पालकांकडे असते. मुख्याध्यापक सचिव असतो, तो मुख्याध्यापक सचिव मुलांचे खाते काढण्याकरिता शालेय मुख्याध्यापकासह अध्यापन व कार्यालयीन विविध कामानिमित्त फिरत असतात. कामांचा एवढा ताण असताना आता पुन्हा नवीन बॅंकेत खाते काढण्याचे काम त्रासदायक ठरणार असल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले.