गरिबांचा फ्रीज हैदराबादला रवाना
By Admin | Updated: March 3, 2017 01:09 IST2017-03-03T01:09:58+5:302017-03-03T01:09:58+5:30
उन्हाळा सुरू होताच मडक्यांची मागणी वाढली आहे. कुरखेडा तालुक्यात कुंभार समाजाचे शेकडो नागरिक मडके तयार

गरिबांचा फ्रीज हैदराबादला रवाना
शेकडो कुटुंबांना रोजगार : व्यापाऱ्याच्या मदतीने होते विक्री
कुरखेडा : उन्हाळा सुरू होताच मडक्यांची मागणी वाढली आहे. कुरखेडा तालुक्यात कुंभार समाजाचे शेकडो नागरिक मडके तयार करीत असून सदर मडके हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले जात आहेत.
कुरखेडा परिसरातील माती मडके बनविण्यासाठी अतिशय चांगली असल्याने उच्च दर्जाचे मडके या ठिकाणी तयार होतात. जानेवारी महिन्यापासून कुरखेडा तालुक्यात मडके बनविण्याच्या कामाला सुरुवात होते. या कामाच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्यातील शेकडो नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. येथील माठांची मागणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात होत असल्याने हैदाराबाद येथील व्यापारी कुरखेडा तालुक्यात येऊन माठांची खरेदी करतात. मोठ्या वाहनामध्ये सदर माठ अतिशय व्यवस्थित भरून ते हैदराबादकडे रवाना केली जातात. (शहर प्रतिनिधी)