अतिक्रमीत जमिनीची विनामूल्य माेजणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:52+5:302021-01-08T05:58:52+5:30
आरमोरी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल याेजनेचा लाभ मिळण्यासाठी नगर परिषदेतील अतिक्रमणधारकांच्या अतिक्रमीत जमिनीची विनामूल्य मोजणी करण्यात यावी, अशी ...

अतिक्रमीत जमिनीची विनामूल्य माेजणी करा
आरमोरी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल याेजनेचा लाभ मिळण्यासाठी नगर परिषदेतील अतिक्रमणधारकांच्या अतिक्रमीत जमिनीची विनामूल्य मोजणी करण्यात यावी, अशी मागणी आरमोरी शहरातील अतिक्रमणधारकांनी केली आहे.
यासंदर्भात अधीक्षक भूमिअभिलेख यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात राबविली जात आहे. अतिक्रमण असलेल्या रामाळा, बीएसएनएल टावर, शेगाव, पालोरा, इंदिरानगर डोंगरी, काळागोटा, तहसील ऑफिस मागील बर्डी, तसेच अरसोडा येथील निवासी प्रयोजनासाठी नियमानुकूल जमिनीची विनामूल्य मोजणी करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती मोजणी शुल्क भरण्याएवढी सक्षम नसल्याने प्रशासनाने सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेअंतर्गत शासकीय जमिनीची मोजणी विनामूल्य करून आर्थिक परिस्थिती नसलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, या उद्देशाने आरमोरी नगर परिषद क्षेत्रातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांच्या जागेची विनामूल्य मोजणी करून गावठाण क्षेत्रांमध्ये समाविष्ट करून देण्यात यावे, अशी मागणी भूमी उपअधीक्षक कार्यालय, आरमोरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही मागणी नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, आरोग्य सभापती भारत बावनथडे आदींनी केली आहे.