शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

पूरग्रस्तांच्या पुनर्वसन भूखंडाची माेफत माेजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

कुरखेडा : शहरातील सती नदी घाटावर वसलेल्या प्रभाग क्र. १७ वरील लोकवस्तीला दरवर्षी पुराचा फटका बसत असल्याने शासनाकडून त्यांना ...

कुरखेडा : शहरातील सती नदी घाटावर वसलेल्या प्रभाग क्र. १७ वरील लोकवस्तीला दरवर्षी पुराचा फटका बसत असल्याने शासनाकडून त्यांना सुरक्षितस्थळी शासकीय जागेत भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सदर जागेची मोजणी करण्याकरिता भूमापन अभिलेख विभागाकडून ४ हजार ५०० रुपयांची मागणी करण्यात येत आहे. येथील बहुसंख्य नागरिक गोरगरीब वर्गातील असल्याने ही रक्कम ते भरू शकत नाहीत. त्यामुळे येथील लाभार्थांची भूखंडाची मोजणी मोफत करून देण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका सहन करणाऱ्या येथील ९९ कुटुंबांना सन २०१०ला शासनाच्या वतीने गांधी वाॅर्डालगत असलेल्या खुल्या शासकीय जागेत भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुसंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने भूखंड उपलब्ध होऊनही घराचे बांधकाम करता आले नाही. मात्र, अलिकडेच यापैकी काही लाभार्थीना नगर पंचायतीच्या वतीने शासकीय घरकूल योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या भूखंडावर बांधकाम करण्यापूर्वी भूमापन अभिलेख विभागाकडून भूखंडाची मोजणी व क शीट या दस्तऐवजाची गरज आहे. मात्र, सदर मोजणीसाठी शुल्क लागत असल्याने येथील गरीब जनतेची पंचाईत झाली आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेत ही मोजणी शासनाकडून मोफत करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

निवेदन देताना शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, कामगार सेनेचे माजी तालुकाप्रमुख डॉ. अनिल उईके, सुकलदास माकडे, उद्धव आठवले, किशन कंगाली, रतन मुत्तेलवार, राजू पिलेवार, रामदास मस्के, जिजा बारसागडे, पांडुरंग चंदनखेडे, मनोहर उईके, कुसूम धुळसे, सविता संगेल, शांता राऊत, मंगला बोरसरे, जगन वारवाडे, मारोती पारडवारी, अरविंद मेश्राम, जगन्नाथ मेश्राम, प्रेमलाल झरबले, मारोती चंदनखेडे, अहेमद पठान, अहेमद कुरेशी, संजय कोटागंले, दिलीप काळबांधे, जनार्दन तुलावी, अली शेख, कादर शेख, शफी शेख, वामन बावनकर, जावेद शेख, शांता बावनकर तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित हाेते.