गिधाडांकडून मोफत स्वच्छता

By Admin | Updated: September 5, 2016 01:36 IST2016-09-05T01:36:40+5:302016-09-05T01:36:40+5:30

गाव व शहरांच्या स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. मात्र गिधाड हे स्वच्छतेचे काम अगदी मोफतपणे

Free cleanliness from vultures | गिधाडांकडून मोफत स्वच्छता

गिधाडांकडून मोफत स्वच्छता

महेंद्रसिंह चौहान यांचे प्रतिपादन : कमलापूर येथे गिधाड संवर्धन दिन
कमलापूर : गाव व शहरांच्या स्वच्छतेसाठी केंद्र व राज्य शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. मात्र गिधाड हे स्वच्छतेचे काम अगदी मोफतपणे करीत असून यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपये वाचत आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही फार मोठी मदत झाली आहे. गिधाडांचे संगोपण व संवर्धन करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वन्यजीव मित्र महेंद्रसिंह चौहान यांनी केले.
जागतिक गिधाड दिनाचे औचित्य साधून सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र कार्यालय कमलापूर येथे गिधाडांचे संगोपण, संवर्धन व महत्त्व याबाबत शनिवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोटार सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्रसिंह चौहान होते. प्रमुख अतिथी म्हणून वन परिक्षेत्राधिकारी सुनिल लाड, रेपनपल्ली उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व्ही. के. दरवडे, गिधाड मित्र सोमय्या, अर्जून राजाराम व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Free cleanliness from vultures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.