गडचिराेली व एटापल्लीत सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:25 IST2021-01-01T04:25:01+5:302021-01-01T04:25:01+5:30
एटापल्ली पाेलीस स्टेशनचे ठाणेदार शीतलकुमार डाेईजड व पाेलीस कर्मचाऱ्यांनी एटापल्लीपासून दाेन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टाेला येथील सैनू जाेही ...

गडचिराेली व एटापल्लीत सुगंधित तंबाखू जप्त
एटापल्ली पाेलीस स्टेशनचे ठाणेदार शीतलकुमार डाेईजड व पाेलीस कर्मचाऱ्यांनी एटापल्लीपासून दाेन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टाेला येथील सैनू जाेही याच्या घरी धाड टाकून ६ हजार ८५ रुपयाचा सुगंधित तंबाखू व दारू जप्त केली. त्याला अटक करून तपास केला असता, एटापल्ली तालुक्यातील ठाेक दारू विक्रेता मनाेज मुजुमदार याच्याकडून दारू खरेदी केली व किराणा व्यावसायिक प्रसाद राजकाेंडावार याच्याकडून सुगंधित तंबाखू खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार पाेलिसांनी मनाेज मुजुमदार याच्यावर गुन्हा दाखल करून ३० डिसेंबर राेजी अटक केली. सैनू जाेही व मनाेज मुजुमदार यांना न्यायालयीन काेठडी मिळाली होती. त्यापैकी मुजुमदार याची जामिनावर सुटका झाली. प्रसाद राजकाेंडावार याच्याविराेधात तंबाखूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते एटापल्लीच्या माजी नगराध्यक्षाचे पती असून वृत्त लिहिपर्यंत ते फरार होते.