रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: July 30, 2016 01:48 IST2016-07-30T01:48:57+5:302016-07-30T01:48:57+5:30
बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी

रेती वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडले
अवैध वाहतूक : महसूल विभागाची कारवाई
गडचिरोली : बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून ३१ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
बोदली घाटावरून अवैध रेतीची वाहतूक केली जात असल्याची बाब नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर गडचिरोलीचे मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे यांच्यासह तलाठी अजय तुंकलवार, भास्कर बांबोळे, विकास कुमरे, गणेश खांडरे यांनी शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता रेती घाटाला भेट दिली असता, बोदली येथील नरेंद्र भांडेकर, दुग्गा, कुकुडकर व गावतुरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. सदर ट्रॅक्टर अडविण्यात आल्या. पंचनामा केल्यानंतर त्या ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आल्या. प्रत्येक ट्रॅक्टरवर ७ हजार ९०० रूपयांचा दंड तहसीलदारांनी ठोठावला. ट्रॅक्टर मालकांनी सदर दंड भरल्यानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आल्या.
गडचिरोली तालुक्यात अनेक रेती घाटावरून अवैधरित्या क्षमतेपेक्षा अधिक व रॉयल्टीपेक्षा जास्त रेतीचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)